Sunday, July 5, 2009

मला आवडलेले Perfect (विक्षिप्त ) लोक...!!!

Perfect हा शब्द किती लोकाना आवडत असेल...??? मला विचाराल तर मला या शब्दाबद्दल खुप आकर्षण जरी नसल तरी हा शब्द मला बिल्कुल आवडत नाही अस सुद्धा नाहीये। पु.ल नी त्यांच्या बर्याच लेखनापैकी " ते चौकोनी कुटुंब" हे लेखन मला नेहमीच वेगला वाटत आलेला आहे। पु.ल च्या सगल्या लेखानां बद्दल ची सगळ्यात मोठी strength म्हणजे ती पात्र जरी काल्पनिक असली तरी आपण ती आपल्या आजू-बाजूला नेहमीच बघितली आहेत असच आपल्याला वाटत असत । आणी "ते..." सुद्धा काही वेगळ नाहिये, पण त्यंच्या इतर लेखानां पेक्षा मी या लेखना मधली पात्र आजू-बाजूला बघितली आहेत अस मला राहून राहून वाटत आलेल आहे। कदाचित तुमच्या पैकी सुद्धा बर्याच जणानी अशी लोक आपल्या आजू बाजूला बघितली असतीलच।
कदाचित गेल्या काही दिवसातला माझ पुण्यातला वास्तव्य मला अस विचार करायला प्रवृत करत असेल पण अशी लोक मी खुप जवलूं बघितलेली आहेत हे मात्र नक्की। असे लोक साधारण पुण्या-मुंबई मध्ये जास्त दिसतात। तुम्हाला वाटत असेल की मी कोकनास्ता बद्दल बोलत आहे पण ह्या लोकांची काही जात- धर्मं किंवा Regional status नसतो। ते फक्त विचित्र आणी विक्षिप्त असतात ।
तुम्ही "दिल चाहता हैं" बघितला असेलच... त्या मध्य सोनाली कुलकर्णीचा जो Boy Friend जसा असतो मी तशा लोकांबद्दल मी बोलतोयही लोक इतकी perfect असतात की तुम्हाला तुमचीच लाज वाटायला लागतेअसल्या लोकाना कुठे मेहनत करावी लागते हे मला तरी वाटत नाही, कारण ही लोक आधीच एवढी prepared [कशासाठी कुणास ठाउक?] असतात की त्याना वेगळ काही करायची गरजच पडत नाही। त्यामुलेच की काय असले लोक हव त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होतात आणी नंतर महाराष्ट्र शासन त्यांच्या कामसाठी त्यांचा पुण्यात गौरव समारंभ organise करते। ह्या लोकाना रेलवेचच नाही तर सिनेमा, विमान आणी ST च तिकिट कधीही आणी हव तिथे मिलत। ह्यांचा आवाज नेहमीच गोड आणी मधुर असतो। असल्या लोकाना सरदार बद्दल चे Jokes Offensive वाटतात। असल्या लोकाना पुण्या मध्ये हवातेव्हा हवा तिथे Parking ची जागा मिळते। मला वाटत असल्या लोकाना कधी कुठल्या गोष्टीची खंत नसेलच, ते फक्त insurance च्या पोस्टरमधल्या कुटुम्बासारखे हसरे असतात।
मला माझ्या आयुष्यात कशाची कमी वाटणार नाही याची कालजी माझी आई-बाबानी जरी घेतली असेल आणी कुठे तरी ते यशस्वी सुद्धा झाले आहेत पण तरीही मला या लोकांचा फार हेवा वाटतो। मला माझ्या आयुष्यातला निदान एक दिवस तरी यांच्यासारख Stress free जगायचा आहे। कदाचित ह्या लोकाना सुद्धा तुम्हा आम्हां सारखेच सुख-दुख असतील पण निदान त्यांच्या कड़े बघून मला माझा आयष्य बदलायला प्रेरणा राहिल।