Sunday, August 2, 2009

शिकाऊ लेखकाची व्यथा

बर्याच दिवसं पासून काही तरी लिहाव असा विचार करतोय। एक-दोन टॉपिक सुद्धा मानत होते पण जेव्हा ते टॉपिक Elaborate करायची वेळ आली तेव्हा पुरेसे points नाहीयेत याची जाणीव झाली। माझ्या अनेक post मध्ये असच झालेल आहे की माझ्याकड़े मुळ कल्पना होती पण तिला बसे ठेवून तिच्यासंदर्भात मुद्द्यांची कमतरता होती। मग अशा पोस्ट च्या शेवटी मग वाचक तू अजुन चांगला लिही....याला नीट अजुन चांगल करता आल तर बघ...अशी प्रतिक्रया देतात।
तुमच्या सोबत सुद्धा अस होत असेल ना की बर्याच वेल्स काहीतरी करावा अशी इच्छा असते पण त्यासाठी ज्या मुद्द्यांची अथवा त्या Elements ची आवश्यकता असते तेच नेमके आपल्या जवळ नसतात। कधी काही लिहायची इच्छा होत असते आणी आपण सुरुवात सुद्धा करतो पण जेव्हा मांडायची वेळ येते तेव्हा ठरवलेला आणी प्रत्यक्षात झालेला लेखन या मध्ये फरक जाणवतो। पण फक्त लेखनच नव्हे तर अशा अनेक गोष्टी असतात जेव्हा आपण थोड्या घाईगडबडी मध्ये काही निर्णय घेतो आणी नंतरच्या निकालाची वाट पाहत नाही।
अनेकदा अनेक गोष्टी नशिबावर अवलंबून असतात. जर नशीब आपल्या बाजूने असेल तर ठीक नही तर पश्चाताप शिवाय हातामध्ये कही उरत नाही. For Example:- बाजारात नविन मोबाईल दाखल झालेला असतो। सर्वसामान्य खरेदी करणारा चार जाणकार लोकांशी बोलतो त्याना त्या मोबाईल संदर्भात माहीती विचारतो आणी सगल्यानी होकार दिल्यावर तो मोबाईल विकत घेतो। पण कधी कधी आपण आपल्या Gut feeling च ऐकतो आणी खरेदी करतो आणी Coincidently तो मोबाईल चांगला सुद्धा निघतो । पण याचा अर्थ proper planning करून काही खरेदी करू नए असा बिल्कुल होत नाही कारण नशीब नेहमीच तुमच्या बाजूने कॉल दिल अस गरजेचा नाहीये।
मी नेहमीच ब्लॉग कार काही पोस्ट करताना जाम confuse असतो। या confusion ला अनेक कारण आहेत, म्हणजे अनेकदा आपल्याला अशा गोष्टी करायच्या असतात ज्या करण्यासाठी ती वेळ बिल्कुल योग्य नसते पण still आपण त्या करतो कारण आलेल्या Gut feeling खुप positive असते । For Example:- एखाद्या आवडनार्या मुलीला फ़ोन करायची मनात खुप इच्छा असते, problem अस असतो की आपल्या कड़े तिच्याशी बोलायला काहीही मुद्दा नसतो पण फक्त तिच्याशी बोलायचा असता मग अशावेळेस Normal मुल दोन पैकी एक गोष्ट करतात एक तर मनाची समजूत घालतात की उद्या फ़ोन करूया म्हणजे रात्र भरा मध्ये काहीतरी टॉपिक ठरवायला वेळ तर मिळेल। किंवा काही धाडसी मूल असतात जे अस विचार करतात की एकदा फ़ोन तिने उचलला की मग ठरवुया की काय बोलायचा आहे ते।
तुम्हाला वरील उदाहरण द्यायचा कारण अस की माझ ब्लॉगच्या बाबतितला धोरण हे दुसर्या प्रकारचा आहे। मी सुरुवात करतो आणी शेवटी हेच विसरून जातो की मला नेमका सांगायचा काय आहे। Of course माझा लेखन gradually improve होणार आहे याची मला पूर्ण कल्पना आहे पण माझा थोडासा Impatient स्वभाव मला काही केल्या स्वस्त बसु देत नाही।
You know something, माझ्या मनामध्ये लेखकानबद्दल पूर्वी फार आदर नव्हतामला वाटायचा की फक्त भाषेवरील प्रभुत्व या लोकाना यशस्वी ठेवून आहेस्वतःच्या अथवा माहितीतल्या लोकांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या एखाद्या प्रसंगावरून प्रेरित होउन त्याला चांगल्या भाषेची सांगड़ घालून हे लोक आपल्यासमोर एक पुस्तक ठेवायचे असा माझा फार चुकीचा समज होता परन्तु जेव्हा मी स्वतः कागद-पेन हातात घेतला (I am talking metaphorically here) तेव्हा त्यांच्या श्रेष्ठत्वाची मला जाणीव झाली