Wednesday, April 22, 2009

मी लेखक होऊ शकतो का....??? ---- १

गेल्या काही दिवसांपासून मी जरासा confused झालो आहे आणी त्याला बरीच कारण आहेत जी मला अस विचार करण्यास प्रवृत करत आहेत। मध्ये माझ्या भावाने श्रीनिवास ठाणेदार यांचे " हीच श्री ची इच्छा" हे पुस्तक मला वाचायला दील होता। पुस्तकाबद्दल बोलायचा झाल तर पुस्तक अप्रतिम आहे आणी त्यातले प्रसंग आणी संगंयाची भाषा ही सुद्धा अतिशय साधी सोपी आणी सरळ होती। त्या मध्ये न भाषे ची काही करामत होती ना कुठल्या वाक्यांची। त्यातल्या एका प्रसंगा मध्ये ठाणेदार सांगतात की america मध्ये ५ वर्ष राहून जेव्हा परत येतात तेव्हा घरी आल्यावर त्याना त्यांची मात्रूभाषा जी की मराठी होती, ती सुद्धा बोलताना अडचन येत होती। तर अस माणुस जो आपल्या भाषेला काही वर्ष परदेशात राहिल्या मुले विसरु शकतो तो असे पुस्तक लिहू शकतो या गोष्टी वर निदान माझा तरी विश्वास बसत नाही। आणी त्यामुले मी वर अस म्हणालो की मी खुप confused आहे।
मराठी साहित्य बद्दल मी काही बोलना योग्य नाही कारण माझ स्वतःचा मराठी फार काही चांगला नाहिये, खर बघता मराठी साहित्य बद्दल माहीती नसन हे एवढच कारण मला मराठी बद्दल judgemental होण्यापासून रोखण्यास पुरेसा आहे का...?? मला तस वाटत नाही, माझ्या मताप्रमाणे मला सुद्धा मराठी साहित्य बद्दल बोलण्याचा तेवढाच अधिकार आहे जितका इतर लेखकाना आहे। या वर्षी फरवरी महिन्या मध्ये जागतिक मराठी साहित्य सम्मलेन US मध्ये आयोजित केला गेला होता। या आयोजनाला महाराष्ट्रियन लेखकानी काही फार उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नाही आणी त्या साथी त्यांची वेगळी कारण असतील पण मला खुप बार वाटला हे बघून की finally आपला साहित्य हे international stage वर जातय आणी याच सम्मेलन मध्ये श्री ठाणेदार हे फक्त उपस्थितच नव्हते तर त्याना मुख्यमंचावर बसवण्यात आले होते आणी इथे माझा आत्मविश्वास वाढला हे बघून की एक व्यावसायिक माणूस लेखकांच्या oscar समजल्या जाणार्या कार्यक्रमा मध्ये नुसता उपस्थित्च नव्हता तर त्याने तो कार्यक्रम हा मुख्य अतिथिचा मान मिलवला।
विचार जो माझ्या मना मध्ये जो चालू आहे तो म्हणजे नेमका लेखक म्हणुन मान मिलावन्या साठी नेमक्या कुठल्या गोष्टी स्वाभाव मध्ये असना आवश्यक असता। मला साहित्या बद्दल नसलेल्या माहीती अनेक गोष्टी जवाबदार आहेत। एक म्हणजे अती शुद्ध मराठी भाषेचा अवलंब जो जुन्या साहित्या मध्ये व्हायचा तो मला पुस्तक अथवा ग्रंथ वाचन्या पासून परावृत करायचा आणी खरा सांगायचा तर तो मला अजुनही करतो। माझा मराठी भाषेच्या वापर बद्दल विरोध नाहिये पण वेळे प्रमाणे मराठी लेखकानी त्यांची भाषा सुद्धा बदलायला हवी होती परन्तु ते तस करण्यास तयार नव्हते आणी इथुनच मराठी साहित्य आणी तरुण पीढी या मधला अन्तर हलू हलू वधु लागला। आज आपल्या आजू बाजु राहणार्या मित्रं पैकी अथवा आपल्या नातेवैका पैकी किती जणानी "श्रीमान योगी" वाचला असेल......????? सरासरी काढायची ठरवली तर जास्तीत जास्त ५०%, किंबहुना त्यापेक्षा कमी लोकानी ते अथवा इतर मोठे व् इतर महत्वाचे मराठी ग्रंथ वाचले असतील।
एक single mom तिच्या मुलाला घेउन england च्या ट्यूब मध्ये फिरत असताना एक पात्र लिहते आणी ते पात्र नंतर इतिहास घडवतो। मी but ofcourse Harry potter आणी ते पात्र तयार करणार्या British author J. K. Rowling बद्दल म्हणतोय। त्या बाईने असा काय फार वेगला लिहला नव्हता पण तिच्या लेखन मध्ये ती पकड़ होती जी कुठला ही वाचक पुस्तक वाचताना अपेक्षित करतो।
एकदा एका माणसाने प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक Martin Scorsese याना असा प्रश्न विचारला होता की तुम्हाला कोणत्या प्रकारचे चित्रपट बनवायला आवडतात...???.... त्यावर त्यांचा उत्तर असा होता की मला असे चित्रपट बनवायला आवडतात जे प्रेक्षक माझ्या कडून बिल्कुल अपेक्षित करत नाही..... याचा इथे संदार्भा द्यायचा झाला तर मराठी साहित्य मध्ये जुने काही मोजके लेखक सोडले तर almost सगल्या लेखकांच लेखन हे मोठ्या प्रमाणावर predictable होता।

मी ग्रामीण विषयाचा महत्व टाळत नाहिये अथवा त्यांच्या मुद्याच्या existance वर सुद्धा मला शंका नाहिये ग्रामीण भगा मधील परिस्थिति अतिशय दयनीय आहे अथवा कालजी करण्या सारखी आहे पण याचा अर्थ तेथील कोणीही नमूना उठून तेथील परिस्थी बद्दल पुस्तका वर पुस्तक लिहिल तर त्या कथे मधील नाविन्य तर संपताच पण त्या पात्रा बद्दल वाचकांची म्हणजेच लोकांची असलेली sympathi सुद्धा संपते।

Monday, April 6, 2009

मराठी चित्रपट आणी मी - ०१

आज पर्यंत मराठी चित्रपटांचा सगळ्यात मोठा critic कोणी झाला असेल तर तो मी आहे हे सांगायला माझी काहीच हरकत नाहीये। माझे आणी माझ्या मोठ्या भावाचे अनेक विषयान वरून शाब्दिक भांडण झाले आहे ( आणी कधी कधी खरे खरे सुद्धा...) पण जेव्हा केंव्हा आमचा मराठी चित्रपट वरून वाद झाले आहे तेव्हा मी विरोधाची भूमिका घेतलेली आहे। त्याचे नेहमी हेच मत असायचे की आपण आपल्या सिनेमा बद्दल आदर ठेवायला हवा, आणी माझी नेहमीच हीच भूमिका असायची की आदर ठेवणे हे नेहमीच गरजेचे नाहीये।

माझा हे स्पष्ट मत आहे की माणुस चित्रपट हा मनोरंजनासाठी बघत असतो त्यात त्याला संस्कृतिशी काही घेणेदेणे नसते , कारण मी जेव्हा माजिद मजीदी यांचा children's of heaven हा iranian cinema बघतो तेव्हा माझ्या मराठी बाणा कुठे कमी होतोय अस बिल्कुल वाटत नाही, मला ईरानी भाषा येत सुद्धा नाही पण तरीही जेव्हा मी तो सिनेमा subtitles सोबत बघतो तेव्हा मला त्या दोघा बहिण-भाव बद्दल कीव सुद्धा येते आणी त्यांच्या बद्दल कुतूहल सुद्धा वाटत।

शालेय शिक्षण हे मराठी मध्यमातुन झाल्या मुले माझा वयाच्या 9 -10 वयापर्यंत English movies मला बिल्कुल समजत नसायच्या मला आमचा मोठा चुलत भाऊ English movies dubbed असतील तरच दाखवायला घेउन जायचा, if he had shown us any English movie in the original language then it would have been impossible for me to understand a single word the protagonist or the other character in the movie are saying , मला अजुन आठवतय माझा आते भाऊ मुंबई मध्ये रहत असताना आम्हा सगल्या मुलाना Sylvester Stallone चा Day light दाखवायला घेउन गेला होता आणी besides Stallone त्या सिनेमा मध्ये काहीच समजन्या सारखे काही नव्हता आणी eventually मी मुंबई मधल्या cinema hall मध्ये A.C ची हवा खात झोप काढली होती, पण सोबतच मला हे सांगायचा आहे की की भाषा समजली नाही म्हणुन मी झोपायचो अस सुद्धा बिल्कुल नव्हता । माझ्या लहानपणी आलेले Hollywood चे children movies ज्या होत्या त्यांपैकी Baby's day out आणी Home alone series च्या movies मी इंग्लिश मध्ये असून सुद्धा अनेक वेळा बघितल्या होत्या।


मुद्दा जो मला इथे हा सांगायचा आहे की चित्रपट हा फक्त मनोरंजनासाठीच असतो त्या व्यतिरिक्त त्याचा दूसरा काही कारण नसता । आपली संस्कृतिच जतन करण्यासाठीच मराठी माणसाने मराठी चित्रपट बघायलाच पाहिजे अस काही धोरण असतील तर ती पूर्णतह
चुकीची आहे आणी माझा त्याला आजही विरोध आहे, but at the same time गेल्या काही वर्षां पासून माझ मराठी चित्रपट बद्दलच मत बदलत चालला आहे आणी त्या साठी मी आज बघितलेला " मी शिवाजी राजे भोसले बोलतोय" हा आणी "वलू" हे दोन मराठी चित्रापट माझ मत परिवर्तन करण्यास कारनिभुत आहेत आहेत जे मला immensely आवडले आहेत

नुसता चित्रपटाचा budget वाढले की चित्रपट सुधारतात असा काही नियम नाही , आणी सध्याचे इतर मराठी चित्रपट जे मी अशात पाहिले ते नुसतेच मोठ्या budget चे होते पण literally फालतू होते, Movies like Checkmate, मुक्काम पोस्ट london आणी जत्रा इ. हे चित्रपट TV वर सुद्धा पाहण्याच्या लायकीचे नव्हते।