Sunday, November 29, 2009

देशाबाहेरच तरुण मराठी मन.....!!!!!!

दुपारची ४:२० ची वेळ लन्दनच्या एका स्टेशनच्या बाहेरील बस स्टॉप वर एक बस उभी असते ती miss झाली तर पुढच्या बससाठी १० मिनिट वाट बघावी लागेल म्हणुन एक मुलगा धावत येतो, पण आज नशीब त्याच्या बाजूने नसल्याने तो येई पर्यंत बस निघून जाते, १० मिनिट्समध्ये lecture असल्याने रिकाम्या बस स्टॉप वर असलेली एकटी मुलगी सुद्धा त्याला दिसत नाही। आयुष्यातले काही मिनिटे अथवा सेकंद किती महत्वाचे असतात हे शिकवण्यासाठी परमेश्वराने सगळ्यात चुकीची वेळ निवडलेली असते पण निवडलेला धडा खुप महत्वाचा असतो। तरी सुद्धा थोड़ा देवाला थोड़ा स्वतःला दोष देत मुलगा येणार्या बसची वाट बघत असतो। आणी काही तरी घोल झाल्याने १० मिनिटानी येणारी बस चुकून ५ मिनिटानी दिसायला लागते। गोऱ्या साहेबाच्या देशा मध्ये येउन काही महीने झाली असली तरी स्वतः शी बोलताना तो थोड़ा हळू थोड मोठ्याने मराठी मध्ये म्हणतो की , "बर झाल रे बाबा तू आज जरा लवकर उगवला आज..!!"। हळूच मागुन आवाज ऐकू येतो, "तुम्ही महाराष्ट्रियन आहात का..??"। मग त्या मुलाला समजता की ज्या मुलीकड़े आपण दुर्लक्ष करत होतो ती आपल्याच महाराष्ट्राचीच आहे।

वरील घटनेतील ओळ न ओळ खरी आहे कारण घडलेला प्रकार जय व्यक्ति सोबत झाल आहे तो मीच आहे। पण तस बघितल तर लन्दन मधल्या कमी-अधिक सगळ्याच महाराष्ट्रियन लोकांची एकमेकांशी ओळख ही याच प्रकारे होत असते। साधारणपणे लोक जेव्हा कोणाला भेटतात तेव्हा मनामध्ये समोरील व्यक्तिबद्दल काही ठोकताले करत असतो की हा नेमका कोण आहे, गुजराती का दक्षिणेतला.....????? पण मला अस करता येत नाही, मला तर लोकाना guess च करता येत नाही। त्यामुले सुरुवातीला English मग राष्ट्रभाषा हिन्दी आणी सगळा विचारून झाल्यावर शेवटी जेव्हा समजता की समोरील व्यक्ति महाराष्ट्रियन आहे मग मराठीमध्ये संभाषण सुरु होत।

खरा सांगायचा तर वयाची २१ वर्ष मराठी लोकांसोबत राहिल्याने मला जरा मराठी आणी महाराष्ट्रियन लोकांपासून एक Brake नित्याचा वाटायला लागला होता। त्यामुले मी ठरवला होता की एक वेळ गरज पडली तर लन्दनमध्ये मी अरबी लोकांसोबत राहेन पण मराठी लोकाना जवळ करणार नाही। पण इकडे आल्यावर माझ्या मनामध्ये कित्येक वर्षं पासून दडून बसलेला प्रेम ळू ळू कधी बाहेर यायला लागला कधी समजलाच नाही. ज्या लोकांना नजरअंदाज़ करायचा अस ठरवला होता तीच जवळ ची वाटायला लागली। त्यांच्याशी कुठलही नात नसताना अशी माणस जवळची वाटू लागतात।

भारतात जय सणा मधली मजा निघून गेल्याने नीरस वाटायला लागले होते ते आपले सण आणी आपल्या परम्परा इथे आल्यावर हव्या हव्याशा वाटायला लागले आहेत। जी गत संस्कृतीची तीच चित्रपटांची। भारतातून टेक ऑफ़ घेताना seat च्या समोर असलेल्या screen वर हात ठेवून मी मनातल्या मनात "पण" केला होता की भारतात परते पर्यंत एक हिन्दी सिनेमा नाही बघायचा पण कसला काय...अहो हिन्दी सोडाच पण आज चक्का मी मराठी चित्रपट बघायला लागलो आहे।

पण काहीही म्हणा आपल्या संस्कृति शी कंतालेल्या लोकानी एकदा तरी परदेशात कमी का होइना पण थोड़ा वास्तव्य करावा म्हणजे बर्याच वर्षां पासून सोबत राहिल्याने नकोसे झालेले लोक आणी भारतातल्या सण आणी प्रथे बद्दल थोड प्रेम आणी थोड़ा आदर जाणवायला लागेल