Wednesday, September 23, 2009

नात्याची गुम्फण...!!!

आपल्या आयुष्याचा आणी त्यामध्ये आपल्याला मिणार्या नात्याचा आपलाच सूत्र असता। अनेक नाती तयार तर लगेच होतात पण त्याची योग्य घड़ी बसायला काही वर्ष तर कधी कधी दशक लागतात। कधी कधी काही नात्याना योग्य घड़ी बसायला वर्ष सोडाच पण काही दिवस सुद्धा खुप होतात। आज मी २१ वर्षाचा आहे, एक दृष्टिकोनातून बघाल तर फार तरुण वाटेल तुम्हाला मी, कदाचित तुमच्यापैकी बर्याच जणाना वाटेल की एवढ्या कमी वयात मला नात्यांच महत्व नसेल, पण कोणतीही गोष्ट एकतर्फी विचार करून बघू नये। माझा सोडाच पण तुम्ही स्वतः २ मिनिट डोळे बंद करून जन्मा झाल्या पासून आज पर्यंतच्या कमाव्लेल्या नातेवैकांची उजणी करून बघा तूम्हाला मी सांगत असलेला मुद्दा पटेल ।

माणसाजवळ भरपूर नाते झाले तर त्याची लोकाना analyse करायची शक्ति बोथट होते, तो सर्वाना एकच तराजू मध्ये मोजायला लागतो या गोष्टीचा विचारही नकरता की आपण घ्राह्या धरलेले लोक अथवा नाते खरच आपले आहेत किंवा नाहीयेत। कस असता की आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्या बाजूने होतील अशी शाश्वती परमेश्वर सुद्धा देत नसतो, त्यामुले नेहमीच परमेश्वर वाईट परिस्थिति मध्ये आपल्या बाजूने उभा राहिल हे गरजेचे नसते, कधी कधी तो आपली परीक्षा घेण्यासाठी परमेश्वर विरोधी पक्षा सोबत असू शकतो। अशा परिस्थिति मध्ये आपण आपल्या आयुष्य मध्ये काय कमावला आणी काय गमावला या base वरून आपल्या आयुष्याचा कल ठरत असतो। जर आपण आपल्या आयुष्यामध्ये चार चांगले मित्रा जरी कमावले असतील तरी आपल्याला त्यांचा खुप फायदा होत असतो। वाईट परिस्थिति मध्ये उपयोग करण्यासाठी आपण नाते जपावे अस मी म्हणत नाहिये पण जर वाईट परिस्थिति मध्ये उपयोगी येणार नसतील ते नाते आणी तसले नातेवैक काय उपयोगाचे।

माझा वय कमी जरी असला तरी या कमी वयामध्ये मी आयुष्याचा अनेक चेहरे पाहिले आहेत, लहानपणी एक हसरा चेहरा पाहिला आहे, तारुण्याचा उम्बरठा आला तेव्हा आयुष्य जगण्यासाठी झालेली मनाची आणी धनाची झालेली घालमेल सुद्धा खुप जवलून पहिली आहे मी। आयुष्य दिसता तितका सोपा नाहीये हे मला समजावन्यासाठी मी एक प्रकारे परमेश्वराचा व्रुणीच आहे। पण आज गेल्या काही वर्षां पासून सुरु असलेल हे वादजरी मोठ्या प्रमाणावर शमलेल असला तरी आज मागे वलून बघताना बराच काही बोधपर वाटतय मला। या
काळमध्ये खुप जवची नाती गमावली सुद्धा आहेत आणी खुप दूरची नविन नाती कमावली सुद्धा आहे।

नात्यांचा आणी आयुष्याचा थोड़ा किचकट असता, आपल्याला कधी कधी अवलोकन करताना अनेक वेळेस बालपण गेल याच दुख असता पण तारुण्य आल याचा आनंद असतो त्याच प्रमाणे जुन्या नाती दुरावली याचा क्लेश असतो आणी नविन नाती मिळाली याचा आनंद सुद्धा असतो, यातला आपल्याला क्लेश हवा आहे की आनंद हे आपण ठरवायचा असता। शेवटी काय तर जून काय आणी नविन काय नात्यांची गुम्फण करता यायला हवी...!!!!

Friday, September 4, 2009

धर्मंवेड

मला या गोष्टीची नेहमीच ख़त राहिली आहे की मला मी जन्मलेल्या धर्माबद्दल पुरेशी माहीती नाही। धर्म हा शब्द ऐकल्यावर आपण सगले एकदमच नकळतच sensitive होउन जातो, आणी त्याला आपल्या धर्माला असलेला प्राचीन इतिहास जवाबदार आहे। लहानपणी झोपताना आई-वडीलानी ऐकव्लेल्या पौराणिक कथा तुमच्या पैकी कितीना बरोबर आठवतात....??? मला तर त्या आठवताना जराशी पंचाइतच होते . नेहमी भीती ही असते की मी कुठल्या दोन कथा एकत्र तर करत नाहीये ना.....????
पौराणिक कथे बदल माझ्या मनात नेहमीच उत्सुकता कमी आणी शंकाच जास्त राहिल्या आहेत....कधी कधी अस वाटत की शेकडो वर्षं पासून सांगन्यात येणार्या कथा आपल्या पीढी पर्यंत येताना कदाचित manipulate तर झाल्या नसतील ना? म्हणजे कुठल्या माणसाला डोक असत ( माझ्या बद्दल लोकाना त्याबद्दल सुद्धा संशय आहे.....??? जाऊ दे उगीच त्यावर इथे clarification द्यायची गरज नाही) कारण ही निसर्गाची देणगी आहे, आणी त्यामुले रावणाला १० डोके होते हे जे बोलला जाता यावर जो पर्यंत मला कोणी काही पुरावा देत नाही तो पर्यंत मला त्यावर विश्वास बसना थोड़ा अवघडच आहे। अहो जिथे कुठल्याही देवाला एक पेक्षा जास्त डोक असल्याचा पुरावा नाहीये तिथे रावणासारख्या दानवाला परमेश्वर आणी निसर्ग १० डोके कसे काय दिल...?? ही एक आख्यायिका का असू शकत नाही.....????? मला पौराणिक कथा सांगायला आक्षेप नाहीये पण त्या सांगताना त्यांच्या वर नीट अभ्यास करून सांगायला हव्या हे माझा स्पष्ट मत आहे।
हिंदू धर्म किती श्रेष्ट आहे आणी इतर धर्म किती नीच आहेत हे मला ठरवायचा काहीही हक्क नाहिये, मला काय पण कोणालाच हा हक्क नाहीये। स्वदेस मध्ये खुप सुंदर वाक्य आहे जेव्हा मोहन गावातल्या लोकाना म्हणतो की," मुझे नाही लगता की मेरा देश दुनिया का सबसे महान देश हैं" त्याच प्रमाणे मीही म्हणेल की मला नाही वाटत की माझा धर्म सगळ्यात श्रेष्ट धर्म आहे। ज्या धर्म मध्ये अजूनही ब्राम्हण-दलित अस भेदभाव केला जातो, तो धर्म मुळआत श्रेष्ट कसा काय होऊ शकतो??
मी आज पर्यंत कुठलीही धार्मिक कादंबरी वाचलेली नाहीये पण मला या गोष्टीचा ठाम विश्वास आहे की कुठल्याच कादंबरी मध्ये लोकांमध्ये त्यांच्या जातिवारून discriminate करा अशी शिकवण कुठल्याच ग्रंथ अथवा कादंबरी मध्ये नसेल, आणी जर अशी कुठली शिकवण असेल तर तिचा पुरस्कार केल्यास कुठल्या प्रकारे हिंदू धर्माचा नुकसान होइल अस मला बिल्कुल वाटत नाही। मला नेहमीच हे वाटत राहिला आहे की कुठलाही धर्मा का असेना त्याच्या निर्मिती मागील मुख्या कारण म्हणजे त्याला मानणारे लोक हे एकत्रित रहावे आणी संघटित रहावे हेच उधिष्ट असत पण जर अपन सध्याची हिंदू धर्मा ची परिस्थिति पहिली तर मला हे बिल्कुल वाटत नाही की आपण एकत्रित आहोत किंवा संघटित आहोत।
मला हे logic पटत की हाताची पाच बोट एक सारखी नसतात पण याचा अर्थ आपण नेहमीच स्वभावगुण सोडून फक्त एकमेकाची जातच पहावी का? मला हे सुद्धा पटत जेव्हा लोक म्हणतात की फक्त हिंदू धर्मा मध्ये थोडी problems आहेत, Christians, Islam मध्ये सुद्धा Discrimination केला जात, पण त्यांचा धर्मा ठीक नाही म्हणुन आपण कसही वागलेल कुठल्याही प्रकारे justify होत नाही।
चलो then, I guess आज funda जरा जास्तच झाला। येत्या काळात VISA येइल अशी अपेक्षा आहे आणी एकदा UK ला गेलो की मग तिथले अनुभव एकदम मजेदार प्रकारे सांगेन हे माझ तुम्हाला एकदम फुल promise आता निरोप घेतो टा-टा..!!!