Friday, September 4, 2009

धर्मंवेड

मला या गोष्टीची नेहमीच ख़त राहिली आहे की मला मी जन्मलेल्या धर्माबद्दल पुरेशी माहीती नाही। धर्म हा शब्द ऐकल्यावर आपण सगले एकदमच नकळतच sensitive होउन जातो, आणी त्याला आपल्या धर्माला असलेला प्राचीन इतिहास जवाबदार आहे। लहानपणी झोपताना आई-वडीलानी ऐकव्लेल्या पौराणिक कथा तुमच्या पैकी कितीना बरोबर आठवतात....??? मला तर त्या आठवताना जराशी पंचाइतच होते . नेहमी भीती ही असते की मी कुठल्या दोन कथा एकत्र तर करत नाहीये ना.....????
पौराणिक कथे बदल माझ्या मनात नेहमीच उत्सुकता कमी आणी शंकाच जास्त राहिल्या आहेत....कधी कधी अस वाटत की शेकडो वर्षं पासून सांगन्यात येणार्या कथा आपल्या पीढी पर्यंत येताना कदाचित manipulate तर झाल्या नसतील ना? म्हणजे कुठल्या माणसाला डोक असत ( माझ्या बद्दल लोकाना त्याबद्दल सुद्धा संशय आहे.....??? जाऊ दे उगीच त्यावर इथे clarification द्यायची गरज नाही) कारण ही निसर्गाची देणगी आहे, आणी त्यामुले रावणाला १० डोके होते हे जे बोलला जाता यावर जो पर्यंत मला कोणी काही पुरावा देत नाही तो पर्यंत मला त्यावर विश्वास बसना थोड़ा अवघडच आहे। अहो जिथे कुठल्याही देवाला एक पेक्षा जास्त डोक असल्याचा पुरावा नाहीये तिथे रावणासारख्या दानवाला परमेश्वर आणी निसर्ग १० डोके कसे काय दिल...?? ही एक आख्यायिका का असू शकत नाही.....????? मला पौराणिक कथा सांगायला आक्षेप नाहीये पण त्या सांगताना त्यांच्या वर नीट अभ्यास करून सांगायला हव्या हे माझा स्पष्ट मत आहे।
हिंदू धर्म किती श्रेष्ट आहे आणी इतर धर्म किती नीच आहेत हे मला ठरवायचा काहीही हक्क नाहिये, मला काय पण कोणालाच हा हक्क नाहीये। स्वदेस मध्ये खुप सुंदर वाक्य आहे जेव्हा मोहन गावातल्या लोकाना म्हणतो की," मुझे नाही लगता की मेरा देश दुनिया का सबसे महान देश हैं" त्याच प्रमाणे मीही म्हणेल की मला नाही वाटत की माझा धर्म सगळ्यात श्रेष्ट धर्म आहे। ज्या धर्म मध्ये अजूनही ब्राम्हण-दलित अस भेदभाव केला जातो, तो धर्म मुळआत श्रेष्ट कसा काय होऊ शकतो??
मी आज पर्यंत कुठलीही धार्मिक कादंबरी वाचलेली नाहीये पण मला या गोष्टीचा ठाम विश्वास आहे की कुठल्याच कादंबरी मध्ये लोकांमध्ये त्यांच्या जातिवारून discriminate करा अशी शिकवण कुठल्याच ग्रंथ अथवा कादंबरी मध्ये नसेल, आणी जर अशी कुठली शिकवण असेल तर तिचा पुरस्कार केल्यास कुठल्या प्रकारे हिंदू धर्माचा नुकसान होइल अस मला बिल्कुल वाटत नाही। मला नेहमीच हे वाटत राहिला आहे की कुठलाही धर्मा का असेना त्याच्या निर्मिती मागील मुख्या कारण म्हणजे त्याला मानणारे लोक हे एकत्रित रहावे आणी संघटित रहावे हेच उधिष्ट असत पण जर अपन सध्याची हिंदू धर्मा ची परिस्थिति पहिली तर मला हे बिल्कुल वाटत नाही की आपण एकत्रित आहोत किंवा संघटित आहोत।
मला हे logic पटत की हाताची पाच बोट एक सारखी नसतात पण याचा अर्थ आपण नेहमीच स्वभावगुण सोडून फक्त एकमेकाची जातच पहावी का? मला हे सुद्धा पटत जेव्हा लोक म्हणतात की फक्त हिंदू धर्मा मध्ये थोडी problems आहेत, Christians, Islam मध्ये सुद्धा Discrimination केला जात, पण त्यांचा धर्मा ठीक नाही म्हणुन आपण कसही वागलेल कुठल्याही प्रकारे justify होत नाही।
चलो then, I guess आज funda जरा जास्तच झाला। येत्या काळात VISA येइल अशी अपेक्षा आहे आणी एकदा UK ला गेलो की मग तिथले अनुभव एकदम मजेदार प्रकारे सांगेन हे माझ तुम्हाला एकदम फुल promise आता निरोप घेतो टा-टा..!!!

2 comments:

prajakta said...

hi nick,u r is a good .n yes i m agree with u jithe brahman-dalit, he bhedbhav hotata to desh mahan nahich.........adhichya yugat jaude pan 21va shatkatpan ajunahi dharmvad chaluch ahe........

good keep it up....
nw i m waiting for u r next blog n UK's experience.
all d best dear

पराग said...

आपल्याकडे पुर्वी पासून कर्मावर आधारलेली वर्ण (जाती) पद्धत होती / आहे. त्यावेळी दलित हा धर्मा नव्हता. तो जातिभेद माणसाने नंतर हिंदू धर्मांमध्ये आणला. विवेकानंद हिंदू धर्मा बद्दला शिकागो मध्ये जे काही बोलले ते फक्त हिंदू धर्माला इतर धर्मांनी वाईट लेखू नये म्हणून. प्रत्येक धर्मामध्ये चांगले आणि वाईट गुण असतात, कोणताच पूर्ण नाही. पण आपल्या समोर जसा धर्म ठेवला जातो तसेच आपण त्याला समजतो. पूर्वीच्या काळी पुराण कथा सांगितल्या जात होत्या त्या फक्त त्या काळातल्या लोकांना नीट समाजाव्यात म्हणून. रावणाला 10 डोकी म्हणजे थोडक्यात त्याची क्रूर बुद्धी वेगवेगळ्या पद्धतीने चालत असावी म्हणून पण असेल. कारण चांगली बुद्धी एकाच रस्त्यानी चालते पण वाईट बुद्धी नाना प्रकारे.
क्षत्रिय, ब्राह्मण वैश्य आणि शूद्र हीच आपल्या कडे पुर्वी पासून चालत आलेली पद्धत होती पण आपण त्याला फाटे फोडले... आणि भरकटत गेलो. हिंदू धर्मा सोडून एतर कोणत्याही धर्मामध्ये देवांनी स्वता अवतार घेऊन माणसांना मदत केल्याचे उदाहरण नाही. प्रत्येक धर्मा मध्ये देवाने (एका शक्ति ने) आपले दूत / प्रेषित च पाठवले आहे.. इस्लाम मध्ये मोहमद पैगंबर, क्रिस्टी समाजात येशू ख्रिस्त .... उपजाती ह्या काही फक्ता हिंदू धर्मा मध्येच नाहीत तर मुसलमान लोकांमध्ये शिया आणि सुनी, प्रोटेस्टंट आणि कॅथोलिक हे क्रिस्टीयन लोकांमध्ये आहेतच की.. आणि ते पण तितकेच कडवे आहेत जितके हिंदू..

आपण फक्त जे चांगले तेच स्वीकारायचे आणि महत्वाचे म्हणजे आपल्याला जी गोष्ट समोर ठेवली जाते तिच्या मुलापर्यंत चा विचार करूनच तिचा स्वीकार करायचा...
चला आता भेटू असेच .. छान लिहिला आहेस लेख, आवडला..