Friday, February 19, 2010

आयुष्यावर बोलू काही.....

"बबुमोशाई, जिन्दगी और मौत उपरवाले के हात में हैं जहापना, उसे न आप सकते हैं न मैं. हम सब तो रंगमंच की कटपुतलिया हैं जिसकी डोर उस उपरवाले के हात मैं हैं...कब, कौन कहाँ उठेगा यह कोई नाही जानता....हा हा हा..."


किती वेळेस आनंद पाहीला आहे तुम्ही लोकांनी...???....मी तर खुप वेळेस पाहीला आहे.....पण जस म्हणतात की काही ओळीचा अर्थ समजायला काही काळ जावा लागतो आणी मग gradually तुम्हाला त्यातला खरा अर्थ समजायला लागतो तस कदाचित माझ्या बाबतीत झाल आहे.....कित्येक वर्ष मी ही सुरेख ओळ एका कानाने ऐकून दुसर्या कानाने सोडून देत होतो पण काही दिवसांपूर्वी मला या ओळीचा खरा अर्थ उमजला....


मला नेहमीच अस वाटत की मानवी आयुष्य आणी नाटकाचा रंगमंच यांच्या मध्ये बरीच समानता आहे....कथेची सुरुवात गोड असते मध्येच विनोद असतो मध्येच गाम्भीर्य असता थोडा सुख असता आणी थोडा-मोठ का होइना दुःख सुद्धा असत।


लोकाना जेव्हा त्यांच्या आयुष्या बद्दल जेव्हा विचारला जात किंवा बोलावासा वाटत तेव्हा आयुष्या बद्दल बोलताना त्याना दुःख, यातना आणी श्रम जास्त आठवतात आणी सुखाचे क्षण सगळ्यात शेवटी आठवतात। पण माझा थोडा वेगळ आहे, मी स्वतःच्या आयुष्याचा अवलोकन कधी स्वतः ला स्वतःच्या ठिकाणी ठेवून करत नाही आणी मी म्हणेल की कोणीही करू नये।


आयुष्याची गति संत जरी वाटत असली तरी ती बरीच वेगवान आहे हे मला कलुन चुकला आहे। मला इथे London ला येउन almost ६ महीने झाले असले तरी बर्याचदा मी खरच इथे आलो आहे हे confirm करण्यासाठी स्वतःला चिमटा घ्यावा लागतो। पण अस होण्यासाठी सुद्धा बरीच कारण आहेत, संथ गतीच्या संभ्रामध्ये जगणार्या माणसाच्या आयुष्याची गति खर्या अर्थाने गतिमान झाली आहे। गतिमान आयुष्याच्या फायद्याचा माहिती नाही पण एवढा नक्कीच सांगू शकतो की याचे फायदे नक्कीच तोट्यापेक्षा कमी आहेत अथवा नगण्यच आहेत। गतिमान आयुष्यामधले बरेच अपेक्षित आणी अनापेक्षित बदल अपेक्षित अथवा अनापेक्षित गति मध्ये होत असतात आणी या बदला मध्ये आपण स्वतः involve अथवा गुंतलेलो असल्याने त्यांच अस्तित्व कळत नाही अथवा त्यांच्या अस्तित्वाचा महत्व समजत नाही।


त्या बदलांचा अस्तित्व समजुन घेण्यासाठी कधी कधी स्वतः चा point of view सोडून कुणा दुसर्या व्यक्तीच्या नजरेतून आपल्या आयुष्याकड़े बघण जास्त फायद्याचा असत। अशा वेळेस आयुष्यातले झालेले बदल आणी त्यानंतरची परिस्थिति आपल्याला स्वछ काचेसारखी दिसायला लागते।


माझा आयुष्यातला होणार्या बदलाला बिलकुल विरोध नाहिये, बदल हा निसर्गाचा एक महत्वाचा नियम आहे आणी किंबहुना तो पाळलाच पाहिजे। पण काही थोड़े बदल जे लोभी मन आणी काळातची गरज म्हणुन मान्य केला आहे तो टालता आला म्हणजे मी समाधान मिळवला।


आधी सांगितल्या प्रमाणे मानवी आयुष्या आणी रंगमंचातल्या साम्यामध्ये एक साम्य अजुन add करायचा झाल तर रंगमंचावर आणी आयुष्या मध्ये खुप व्यक्तिरेखा येत असतात। काही व्यक्तिरेखा रंगमंचावर खुप वेळ असतात आणी काही खुप कमी वेळ असतात। काहींचा रंगभूमीवर गरजेपेक्षा जास्त राहाण खटकता तर काही व्यक्तिरेखांचा अपेक्षे पेक्षा लवकर जाण खटकता। आयुष्याचा सुद्धा असच काहीसा आहे काही व्यक्तींचा सोबत कितीही आवडत असली तर सहवास मिळत नाही.....तो मित्र अथवा भाऊ असू शकतो, मैत्रिण असू शकते किंवा प्रेयसी असू शकते.....काही नशीबवान व्यक्ति अशा असतात की ज्याना सगळ्यांचा किंवा थोड्या लोकांचा तरी सहवास आयुष्याभर मिळतो पण काही व्यक्तिना आयुष्याभर त्या व्यक्तींचा हव्यास तर रहातोच आणी सहवास जरी मिळाला तर दुर्दैवाने मग आयुष्यच रहात नाही।


माणसाच्या आयुष्याच्या रंगमंचाच्या खेळाला वेळेच बंधन नाहिये, खेळ सुरु होउन बराच वेळ झाला आहे। बरीच पात्र आली आहेत बरीच पात्र येउन निघून गेली आहे आणी कदाचित बरीच पात्र यायची आहेत आणी ती येतील सुद्धा। कोणाचा तिरस्कार होइल किंवा कोणाचा हेवा वाटेल पण जे काही करायच आहे ते आज या भूमिकेवर जो जगतो तो सुखी राहतो। कारण मंध्यांतराची वाट तर सगलेच बघत असतात, मध्यांतरानंतर आयुष्या ठराविक पधातिने जगु असे सगलेच ठरवत असतात। आणी त्यामुलेच मला "आनंद" मधला संवाद खुप आवडतो जेव्हा तो म्हणतो की "...हम सब तो रंगमंच की कटपुतलिया हैं जिसकी डोर उस उपरवाले के हात मैं हैं...कब, कौन कहाँ उठेगा यह कोई नाही जानता...." आणी त्यामुले आयुष्याचाच्या मध्यन्ताराची वाट बघू नका....Live in the moment.....कारण या खेलामध्ये पडदा कधी टाकायचा हे तुमच्या आमच्या नाही कोणा तिसर्याच्याच हातात आहे..... Thank You